*कोकण Express*
*सेवाभावी व सुशिक्षित उमेदवारांना कुडाळात मनसे संधी देणार…*
*बैठकीत निर्णय; नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
येथील नगरपंचायत निवडणुकीत मनसेकडून सेवाभावी व सुशिक्षित उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशा उमेदवारांनी पुढाकार घेऊन नशीब आजमावे, मनसेकडून त्यांचा उचित सन्मान केला जाईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली. या संदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली.
यावेळी माजी संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव,एस टी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी,महिला तालुका अध्यक्ष सुप्रिया मेहता,शहर अध्यक्ष सिद्धेश खुटाळे ,शहर उपाध्यक्ष वैभव परब,सचिव रमा नाईक,उप तालुका अध्यक्ष जगन्नाथ गावडे, साळगाव विभाग अध्यक्ष सूरज घाटकर, केरवडे ग्रा.प सदस्य सुशांत परब,शाखा अध्यक्ष विनीत परब,प्रथमेश धुरी, आदील शहा,सिद्धांत बांदेकर,संकेत पिसे,सागर सावंत आदींसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.