*कोकण Express*
*एस.टी. आगाराबाहेरील मंडप हटवून बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मज्जाव करा..*
*एस.टी. विभाग नियंत्रकांनी पोलिस प्रशासनाकडे केली निवेदनातून मागणी…*
जिल्ह्यातील एस.टी. विभागीय कार्यशाळा तसेच विविध आगारांच्या बाहेर मंडप घालून बसलेल्या एस.टी. कर्मचार्यांना मज्जाव करावा. तसेच येथील मंडप काढून टाकावेत जेणेकरून कामावर येणार्या कर्मचार्यांना मज्जाव होणार नाही अशी मागणी निवेदनातून एस.टी. विभाग नियंत्रकांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक यांनी याबाबत सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड आणि विजयदुर्ग येथील पोलिस ठाण्यात याबाबतचे निवेदन दिले आहे. एस.टी. प्रशासनाने संप मोडीत काढून एस.टी. सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअनुषंगाने अनेक कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. तर अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. मात्र आगारांबाहेर संपकरी एस.टी. कर्मचार्यांचा ठिय्या कायम आहे. त्यामुळे एस.टी. वाहतूक सुरू करता येत नसल्याची अडचण एस.टी. प्रशासनाची झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी एस.टी. आगाराबाहेर बसलेल्या सर्व संपकरी कर्मचार्यांना तेथे बसण्यास मज्जाव करावा. तेथील मंडप काढून टाकावेत अशी मागणी एस.टी. प्रशासनाने पोलिस प्रशासनाकडे केली आहे.