ओम स्वामी परिवार चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना

ओम स्वामी परिवार चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना

*कोकण Express*

*ओम स्वामी परिवार चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना*

*कणकवली ः प्रतिनिधी*

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशिर्वादाने सिंधुदुर्गात कणकवली येथे ओम स्वामी परिवार चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे या ट्रस्टचे कार्यक्षेत्र असणार आहे. या ट्रस्टमार्फत कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, धार्मिक, रोजगार, पर्यटन विषयक बहुउद्देशीय उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या ट्रस्टची प्राथमिक स्वरूपाची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारी समिती, उत्सव समिती व सल्लागार समितीची निवड करण्यात आली आहे.

या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भाई जेठे, अनंत सावंत व अन्य सहकार्‍यांनी 30 जून 2020 रोजी ओम स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्याबरोबरच ना नफा ना तोटा या तत्वावर भविष्यात जिल्हावासीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जाणार आहेत. या ट्रस्टच्या परिवारातील मंडळींनी एकत्र येवून गुरूवारी कलमठ येथील स्वामी समर्थ महाराज मठ येथे श्री गणेश पूजन, नवनिर्मित पावती पुस्तक पूजन, पूजाअर्चा असे विधी करण्यात आले. त्याला मठाचे विश्वस्त श्री. मठकर गुरूजी यांनी सहकार्य केले.या ट्रस्टबाबत संस्थापक अध्यक्ष भाई जेठे, प्रा.हरिभाऊ भिसे, दादा कुडतरकर, दीपक बेलवलकर यांनी माहिती दिली. ओम स्वामी परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने स्वामी भक्तगणांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आणि त्यातून अनेक स्वामीभक्त आणि सामाजिक सहकारी जोडले गेले. यातुनच या ट्रस्टमार्फत विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय असे विविध उपक्रम राबविण्याची संकल्पना पुढे आली. हे कार्य अधिक गतीने पुढे नेण्यासाठी या ट्रस्टची जिल्हा कार्यकारी समिती निवडण्यात आली आहे. या ट्रस्टच्या कार्यकारी समिती अध्यक्षपदी दीपक बेलवलकर, कार्याध्यक्षपदी प्रा. हरिभाऊ भिसे, उपाध्यक्ष हनिफ पिरखान, परेश परूळेकर, सचिव सिताराम उर्फ दादा कुडतरकर, सहसचिव सौ. वर्षा मडगावकर, खजिनदार सौ.लिना काळसेकर, समन्वयक महेश कोदे, संचालकपदी संजय राणे, संदीप परब, दीपक परब, राजू चिंदरकर, संतोष टक्के, सौ. मनिषा कवठकर, सौ. सुप्रिया पाटील, सौ. स्नेहल हरमलकर, सौ. पूजा पारकर, डॉ. हर्षद पटेल, पुरूषोत्तम कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उत्सव समिती सदस्यपदी सौ. विजयश्री कोदे, सौ. ऋतुजा कोरडे, राजेश सावंत, सुशांत दळवी, महानंद चव्हाण आणि सल्लागार समिती सदस्यपदी अ‍ॅड. उमेश सावंत, उमेश गाळवणकर, अ‍ॅड. रईस पटेल, सौ. निशा केळुसकर, पत्रकार अजित सावंत, अ‍ॅड. विलास परब, रवींद्र मुसळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!