*कोकण Express*
*सकाळच्या बातम्या : ३ डिसेंबर २०२१*
*_लस नाही तर पगार नाही; ‘या’ जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची उडाली धांदल_*
जिल्ह्यात कोविड लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आता थेट ॲक्शन मोडवर येत लस न घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन नामंजूर करण्याचे आदेश जिल्हा कोषागार कार्यालयास दिले आहे
*_किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही’; शिवप्रेमींच्या निर्धाराने मोठा पेच_*
रायगड किल्ल्यावर असलेल्या माळावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही, असा निर्धार शिवप्रेमींनी केला आहे. यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
*_अयोध्येत बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीने खळबळ; ‘या’ राज्यातून कॉल_*
उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच मथुरा आणि अयोध्या केंद्रस्थानी आले असून अयोध्येत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
*_ओमिक्रॉनच्या एंट्रीने भारतात खळबळ; कडक निर्बंधांची शक्यता, ‘या’ राज्यांत…_*
भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. कर्नाटकात या व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले आहेत तर यातील एका रुग्णाच्या संपर्कातील पाच जण चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कर्नाटकसह सर्व राज्ये सतर्क झाली असून केंद्र सरकारही या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावले टाकताना दिसत आहे.
*_यशराज फिल्म्सकडून ‘द रेल्वे मेन’ या वेब सीरिजची घोषणा, आर माधवनची प्रमुख भूमिका_*
रेल्वे मेन ही वेब सीरिज 2 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन केके मेनन प्रमुख भूमिका साकारणार आहे
*_मोबाईलची बेल वाजल्यास ‘या’ हायकोर्टात भरावा लागणार दंड, सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोबाईल फोन राहणार जप्त_*
उच्च न्यायालयाने दंडाची रक्कमही निश्चित केली आहे. असे नाही की दंड भरल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन तुम्ही घरी जाणार आणि कोर्टातील तुमचे काम संपवून येणार. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोबाईलही न्यायालयात जमा केला जाणार आहे. हा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने नुकताच जारी केला आहे.