*कोकण Express*
*साटेली भेडशी येथे मुसळधार पावसामुळे घरावर वीज पडून महिला जखमी*
*घरातील सर्व इलेक्टरीक वस्तू जळून साधारण 2 लाख 40 हजाराचे नुकसान*
आज दोडामार्ग तालुक्यात मुसळधार झालेल्या पावसाने तालुक्यातील साटेली भेडशी येथील विष्णू मोहन नाईक यांच्या राहत्या घरावर वीज पडून घरात असणाऱ्या सुनीता मोहन नाईक (40), व सुजाता हडकर यांना विजेचा धक्का लागल्याने त्या जखमी झाल्या त्यांना लगतच्या भेडशी प्राथमिक हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर तात्काळ उपचार करू घरी पाठवण्यात आले.
तर घरातील सर्व इलेक्टरीक वस्तू जळून साधारण 2 लाख 40 हजाराचे नुकसान झाल्याचे त्यांचाकडून सांगण्यात आले.