*कोकण Express*
*एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी मोदी सरकारने विकली…..*
✅ सरकारी मालकीच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या विक्रीला मंगळवारी केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. आता नंदल फायनान्स ऍण्ड लिजींग या कंपनीला २१० कोटींना ही कंपनी विकण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमी*
➡️ सरकारने काही आठवड्यांपूर्वीच टाटा समुहासोबत एअर इंडियाच्या विक्रीचा करार केला होता. याच आर्थिक वर्षामध्ये सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा व्यवहार पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.
➡️ सरकारने निर्गुंतवणूकीकरणाच्या माध्यमातून १.७५ लाख कोटी रुपयांचा निधी उभा करण्याचे लक्ष्य समोर ठेवे आहे.