आदिनाथ वारकरी सांप्रदायच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

आदिनाथ वारकरी सांप्रदायच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

*कोकण Express*

*आदिनाथ वारकरी सांप्रदायच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन*

*वैभववाडी : भोम येथे 7 डिसेंबर रोजी ह.भ.प. दत्ताराम महाराज समाधी मंदिराचे उद्घाटन*

*वैभववाडी  ः प्रतिनिधी*

आदिनाथ वारकरी सांप्रदाय यांच्यावतीने स्वानंद सुखनिवासी ब्रम्हमूर्ती गुरुवर्य ह.भ.प.दत्ताराम महाराज भालेकर यांच्या समाधी मंदिराचे उद्घाटन व 17 वा पुण्यतिथी सोहळा दिनांक 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत भोम येथे आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्त दररोज सकाळी काकड आरती, प्रवचन, हरिपाठ, किर्तन, जागर असे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी स्थापना संकल्प व पुण्याह वाचन, मुर्ती स्थापना, प्राणप्रतीष्ठा, होम हवन, पुर्णाहुती व आरती, कलशारोहण ह.भ.प.रवींद्र महाराज सुकाळी ( आळंदी) यांच्या हस्ते होणार आहे.

सायंकाळी 4 ते 5 वा. ह.भ.प.संदेश महाराज वाफेलकर ( ताम्हाणे) यांचे प्रवचन. तर 5 वा. सामुदायिक हरिपाठ होईल. सायंकाळी अजित बुवा गोसावी तिवरे कणकवली यांची अभंगवाणी कार्यक्रम होणार आहे. तर राञौ ह.भ.प.विश्वास महाराज जामदार ( भोम ) यांचे किर्तन होईल.

बुधवार दिनांक 8 रोजी सकाळी गिता महात्म्य विष्णू सहस्ञनाम, तर सकाळी 10 ते 12 दरम्यान ह.भ.प.चांगदेव महाराज काकडे ( जालना) यांचे पुष्पांजली किर्तन होणार आहे. दुपारी 12 ते 1 वा.वारकरी भजन मालिका प्रकाशन, तर सायंकाळी 4 ते 5 ह.भ.प.सुरेश महाराज सावंत ( मुंबई ) यांचे प्रवचन, तर राञौ ह.भ.प.रमेश महाराज शिवापूरकर( पंढरपूर) यांचे जागर किर्तन होणार आहे. गुरुवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 11 वा.काल्याचे किर्तन ह.भ.प.अनंत महाराज मोरे ( मौंदे) तर दररोज दुपारी व राञी महाप्रसाद आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन आदिनाथ वारकरी सांप्रदाय संचालक गुरुवर्य ह.भ.प.मारुती महाराज भालेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!