*कोकण Express*
*’मटेरिअल रिकवरी फॅसिलिटी सेंटर’ला आरोग्य सभापतींची भेट*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी नगरषरिदेचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर व नगरसेवक आनंद नेवगी यांनी नगरपरिषदेच्या कारिवडे येथील ‘मटेरिअल रिकवरी फॅसिलिटी सेंटर’ला भेट देत तेथील कामाचा आढावा घेतला.
या ठिकाणी सुक्या कचऱ्याच वर्गीकरण केले जाते. यासाठी ‘वन टु फाईव्ह टीपीडी’ मशिन देखील याठिकाणी आणण्यात आली आहे.
ती मशीन बसविण्याच काम सुरू असून या कामाची पहाणी आडिवरेकर व नेवगी यांनी केली. तर लवकरच या मटेरिअल रिकवरी फॅसिलिटी सेंटरचा शुभारंभ देखील होणार असून हा प्रोजेक्ट इतर नगरपरिषद, नगरपंचायतसाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास आरोग्य सभापती आडिवरेकर यांनी व्यक्त केला. यानंतर त्यांनी डंपिंग ग्राऊंडवर जात येथील कचरा वर्गीकरणाचा देखील आढावा घेतला.