*कोकण Express*
*भाजपा पदाधिकाऱ्यांचे एसटी विभागीय कार्यशाळेबाहेर लाक्षणिक उपोषण*
*शिवसेना पदाधिकारी गीतेश कडू यांच्यावर कारवाईची मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना पदाधिकारी गीतेश कडू हे कार्यालयीन वेळेत पक्षीय आंदोलनात सहभागी होत आहेत. त्याबाबत तक्रार करून देखील कोणतीही कारवाई केली नसल्याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी विभागीय कार्यशाळेत समोर लाक्षणिक उपोषण छेडले आहे. गीतेश कडू हे कार्यालयीन वेळेत पक्षीय आंदोलनात सहभागी होत असल्याप्रकरणी यापूर्वी लक्ष वेधून देखील कोणतीही कारवाई केली जात नसल्याने उपोषण छेडत असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिली.
या उपोषणात तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पंचायत समिती सदस्य महेश लाड, सचिन परधीये, अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, नितीन पाडावे, गणेश तळगावकर, राजू पेडणेकर, संतोष पुजारे, विजय चिंदरकर, समीर प्रभुगावकर, सुभाष मालंडकर, सागर राणे, प्रवीण दळवी, मिलींद लाड, भाई सावंत, सचिन खेडेकर, राजा डिचोलकर, शशी राणे, महेंद्र कुडाळकर आदी सहभागी झाले आहेत.