फोंडाघाट महाविद्यालयात एड्स दिन संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयात एड्स दिन संपन्न

*कोकण  Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात एड्स दिन संपन्न*

*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*

कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने एड्स दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन जंगम उपस्थित होते. आपल्या मनोगतात बोलताना ते म्हणाले की एच.आय.व्ही.चा व्हायरस दक्षिण आफ्रिकेतून आला नंतर तो युरोपमध्ये प्रसारित झाला. हा आजार बरा होणे कठीण असते. डोळ्याने दिसू न शकणारा हा व्हायरस अतिसूक्ष्म आहे. एड्स किंवा अन्य आजार हा माणसाच्या प्रवृत्तीमुळेच वाढतात. माणसाचे वागणे अमर्याद झाले असून त्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. हे होऊ नये म्हणून तरूण वर्गाने जागरूक राहणे गरजेचे आहे. जागरुक राहण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

एड्सचा प्रसार होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे असुरक्षित शरीरसंबंध हे आहेत. म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे या रोगाचा प्रसार थांबेल. हा रोग रक्तातून संक्रमित होतो. अनुवंशिकतेतून ही प्रसारित होतो. त्यामुळे या गोष्टींचीही आपण काळजी घेणे गरजेचे आहे.

वैद्यकीय क्षेत्रातही आजार हा आजार पसरतो त्यामुळे वैद्यकीय साहित्य हाताळताना पूर्णतः निर्जंतुकीकरण गरजेचे असते. त्यामुळे कोणतीही घाई करून तेथे चालत नाही. एड्समुळे इतर आजारही बळावतात त्यामुळे सर्वांनी विशेषतः तरुणांनी या आजाराची माहिती करून घेणे घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत एड्स जनजागृती अभियान चालवले जाते. माणसाला सगळं माहीत असतं तरी पण निष्काळजीपणे वागतो. आरोग्य ही खूप मोठी संपत्ती आहे. आणि ती सांभाळण्यासाठी स्वतःलाच काळजी घेतली पाहिजे. स्वतःच्या काळजीने स्वतःचे तसेच समाजासाठी ते उपयुक्त आहे. काही वर्षांपूर्वी एड्सचे आक्रमण झाले परंतु काळजी घेतल्याने त्यावर बऱ्याच अंशी आपण मात करू शकलो. हे वास्तव आहे. त्यामुळे काळजी हाच उपाय हे ब्रीद आहे. असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्यावतीने विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. तर आभार डॉ. संतोष रायबोले यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने एन.सी.सी. कॅडेट उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!