*कोकण Express*
*परदेशात जाणाऱ्या नागरिकांना जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोरोना प्रतिबंध लस उपलब्ध करून देण्यात यावी*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे*
वरील विषयास अनुसरून आम्ही आपणास सांगू इच्छितो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक हे परदेशात कामानिमित्त जात आहे परंतु त्यांनी घेतलेले कोरोना प्रतिबंधक लस ही त्यांना वेळेत उपलब्ध होत नाही आज अनेक परदेशात जाणारे नागरिक लस घेण्यासाठी आपल्या जिल्हा रुग्णालयात येत आहेत परंतु त्यांचा कालावधी हा पूर्ण होत नाही इतर ठिकाणी त्यांना लस दिली जात नाही त्यांना लस घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त जिल्हा रुग्णालय या ठिकाणीच त्यांना लस दिली जाते परंतु ही लस फक्त आपल्या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे तरी काही नागरिक आपल्या रुग्णालयात दोन तीन दिवस हेलपाटे मारून देखील त्यांना लस भेटत नाही अशा तक्रारी आमच्याकडे वारंवार येत आहे त्यामुळे सदर घटनेची तात्काळ दखल घ्यावी व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय तसेच शिरोडा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सदर दोन्ही उपजिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध करून द्यावी ही विनंती