*कोकण Express*
*भाजपा नेते तथा विद्यमान बँक संचालक अतुल काळसेकर यांनीही भरला उमेदवारी अर्ज*
*बँक निवडणुकीत भाजपाने उमेदवारी अर्ज भरण्यात मारली बाजी;४ अर्ज दाखल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार ३ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. आतापर्यंत भारतीय जनता पार्टी कडून वेगवेगळ्या गटातून चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. भाजपा नेते तथा विद्यमान बँक संचालक अतुल काळसेकर यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे दाखल केला आहे.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार बाळ माने, जयदेव कदम, अमित आवटे, संदीप नलावडे आदी उपस्थित होते.