*कोकण Express*
*कोल्हापूर जिल्हा व कर्नाटक राज्याच्या सर्व सीमा केल्या बंद*
*ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचे आदेश*
*प्रवासासाठी RTPCR निगेटिव प्रमाणपत्र किंवा कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र असणार बंधनकारक*
*कोल्हापूर ः प्रतिनिधी*
‘ओमीक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचे रुग्ण आढळू लागल्याने कर्नाटक शासनाने कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवरील तपासणी पथके अलर्ट केली आहेत. आरटीपीसीआर निगेटिव प्रमाणपत्राशिवाय कर्नाटक राज्य प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. आता कर्नाटक पाठोपाठ कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव प्रमाणपत्र किंवा कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. या आशयाचे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.