*कोकण Express*
*वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहिर…*
*जुईली पांगम प्रथम तर सुप्रिया पाटील द्वितीय…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका परीक्षेत येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्राचा निकाल १०० टक्के लागला.दरम्यान या परीक्षेत येथील जुईली पांगम यांनी ९६% गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला.कणकवली येथील सुप्रिया ठाकूर-पाटील यांनी ९५. ५०% गुणांसह द्वितीय,तर कणकवलीच्या स्वप्नाली पांचाळ आणि आजगाव-सावंतवाडी येथील गणेशप्रसाद गोगटे यांनी ९४% गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
मालवण येथील समर्थपल्लवी तारी आणि सावंतवाडी येथील अॅड.परिमल नाईक यांनी ९३.५०% गुणांसह चौथा तर सोनुर्ली येथील सुजाता धडाम यांनी ९२.५०% गुणांसह पाचवा क्रमांक पटकाविला.श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष अॅड.दीपक नेवगी,कार्याध्यक्ष प्रा.प्रवीण बांदेकर,केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे,केंद्र संयोजक राजेश मोंडकर,ग्रंथपाल महेंद्र पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.