*कोकण Express*
*सकाळच्या बातम्या : ३० नोव्हेंबर २०२१*
*_भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव?; द. आफ्रिकेतून आलेल्या ‘त्या’ प्रवाशात वेगळी लक्षणे_*
दक्षिण आफ्रिकेतून भारतात बेंगळुरू येथे परतलेल्या दोन प्रवाशांपैकी एका प्रवाशामध्ये करोना संसर्गाची जी वेगळी लक्षणे आढळली आहेत त्याने चिंतेत भर टाकली आहे.
*_पवार-ठाकरे-ममतांचं काय शिजतंय?; मुंबईतील ‘या’ भेटीगाठींकडे देशाचं लक्ष!_*
राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे आव्हान उभे करण्यासाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू असताना ममता बॅनर्जी यात महत्त्वाची भूमिका निभावताना दिसत आहेत.
*_दोन लस धारकांनाच ‘बेस्ट’ प्रवासाची मुभा_*
दक्षिण आफिक्रेच्या ओमायक्रॉन व्हेरियंंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नवीन नियमावलीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून दोन लस मात्रा घेतलेल्यांनाच प्रवासाची मुभा दिली आहे.
*_दिलासा! राज्यात आज कोरोनाचे नवे रुग्ण घटले, एकूण सक्रिय रुग्णही झाले कमी_*
राज्यात आज ५३६ नव्या रुग्णांचे निधन झाले असून ८५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ८५४ वर खाली आली आहे.
*_लाच घेतल्याचा आरोप असलेल्या चार पालिका अधिकार्यांना बढती_*
लाच घेतल्याचा आरोप असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परवाना विभागातील चार अधिकार्यांना बढती देण्यात आली आहे.
*_कानपुरमध्ये पहिली कसोटी अनिर्णित, ‘या’ Kiwi खेळाडूंनी भारताच्या विजयाची संधी हिरावली_*
टीम इंडियाला कानपूर कसोटी जिंकण्याची चांगली संधी होती, पण ते विजयापासून एक विकेट दूर राहिले. पण फक्त काही किवी खेळाडूंच्या चिवट खेळीमुळे टीम इंडियाची विजयाची संधी हिरावली. यामध्ये सर्वात आघाडीवर नाईट-वॉचमन विल सोमर विलचे नावे येते.