*कोकण Express*
*जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्येही जागा वाढणार…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नगरपालिका आणि महानगरपालिका प्रमाणेच आता जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्येही लोकसंख्येनुसार जागा वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांना याचा फायदा होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. आणि निर्णय घेण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीत या जागा वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे. या वाढलेल्या जागांनुसार राजकीय पक्षांना आपली रणनीती ठरवावी लागणार आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार या जागा वाढणार आहेत. यात सहा ते सात टक्के जागांचा समावेश आहे. त्याची अंमलबजावणी येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना व इच्छुकांना आता तशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी लागणार आहे.