सकाळच्या बातम्या :- 29 नोव्हेंबर 2021

सकाळच्या बातम्या :- 29 नोव्हेंबर 2021

*सकाळच्या बातम्या :- 29 नोव्हेंबर 2021*

▪️दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या व्यक्तीला कोरोना, ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही; आरोग्य यंत्रणेला जीनोम सिक्वेन्सिंगचा अहवालाची प्रतीक्षा

▪️ सिंगापूरहून मुंबईत येणारे मुंबई विमानतळावर 42.86 कोटी रुपयांचे 3,646 आयफोन्स जप्त, DRI ची कारवाई

▪️ जिओने आपल्या रीचार्ज प्लॅनच्या किंमतीमध्ये 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा घेतला निर्णय; ही किंमतवाढ येत्या 1 डिसेंबरपासून लागू होणार

▪️ लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, आरोग्याची बंधने पाळावी लागणार; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

▪️ भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाखेर 4 धावांवर 1 विकेट, न्यूझीलंडला आता विजयासाठी 90 ओव्हरमध्ये 280 धावांची गरज

▪️ ओमिक्रॉन: नेदरलँडमध्ये 13 जणांमध्ये आढळला ओमिक्रॉन व्हेरिएंट, सर्वजण दक्षिण आफ्रिकेतून एमस्टर्डमला पोहोचले होते

▪️ माझी विधाने चुकीच्या पद्धतीने व्हायरल केली जातात, वास्तव मांडतो म्हणूनच माझ्यावर टीका; इंदुरीकर महाराज यांनी टीकाकारांचा घेतला समाचार.

▪️ जल जीवन मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात 67 टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी ; केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे बिहारनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी

▪️ पुढचे 3 दिवस पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता; गुजरात, महाराष्ट्र, गोव्यात पावसाची शक्यता; मुंबई-ठाण्यातही पावसाचा अंदाज

▪️ राज्यात रविवारी 832 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 841 रुग्ण झाले कोरोनामुक्त; राज्यात आतापर्यंत 64 लाख 81 हजार 640 रुग्णांनी केली कोरोनावर मात

▪️ गोव्यातील 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘गोदावरी’ला दोन पुरस्कार ; जितेंद्र जोशी सर्वोत्कृष्ट अभिनेते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!