*कोकण Express*
*▪️विविध विकास कामांचे भूमीपूजन करून ” संविधान सन्मान दिन ” साजरा.*
*कासार्डे ः संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील साळिस्ते ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ७२व्या संविधान दिनाचे औचित्य साधून विविध विकास कामाचे भूमिपूजन करून एक वेगळा आदर्श गावाने निर्माण केला आहे. गावच्या सरपंच मैथिली कांबळे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यामध्ये साळिस्ते ग्रामपंचायत कार्यालय ते बौद्ध वाडी, येथील बुद्ध विहार येथे असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बौद्धवाडी नळयोजना दुरुस्त करणे, बौद्ध वाडी ते मांजरवाडी शाळेपर्यंत पायवाट बांधणे ,चर्मकार वाडी येथे हायमास्ट बसवणे ,या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले .
या कार्यक्रमाला उपसरपंच शांताराम कांजिर, ग्रामसेवक विशाल वरवडेकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, माजी सरपंच चंद्रकांत हरियाण ,अनंत बारस्कर, माजी सरपंच उदय बारस्कर ,मंगेश कांबळे ,साळिस्ते विकास मंडळाचे अध्यक्ष विजय कांबळे, सचिव गिरीश कांबळे, सल्लागार सुरेश साळिस्तेकर, वैभव कांबळे ,मयुरेश लिंगायत, हिम्मत कांबळे ,पोलीस पाटील गोपाल चव्हाण ,तंटामुक्त अध्यक्ष ताम्हणकर ,सर्व वाडी प्रमुख व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.