*कोकण Express*
*▪️दोडामार्ग मधे महिला अत्याचार च्या वाढत्या घटना चिंताजनक*
*▪️सिंधुदुर्ग जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा शैलेश दळवी*
हल्ली दोडामार्ग तालुका मधे हल्ली च्या दिवसात महिला अत्याचार च्या घटना वारंवार घडत आहेत. कालच आयी हया गावा मध्ये घडलेला प्रकार हा त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. एका मुलीचा सतत पाठलाग करून तिच्या वर लग्नाचा दबाव आणणे आणी तिच्या घरी जाऊन गाड्या पेटवने म्हणजे स्त्री अत्याचार चा कळस आहे. कामावर जाणाऱ्या महिलांना संरक्षण देण्याची पोलिस ची जबाबदारी आहे. महिलांना कायद्याचे संरक्षण देऊन ही घाणेरडी मानसिकता वेळीच ठेचली गेली पाहिजे. ह्या रोड रोमियो चा योग्य बंदोबस्त करण्यासाठी आपण पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग ह्यांना निवेदन देणार आहे आणि हया घटनाची योग्य दखल घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.