कणकवलीत एका बंगल्यासह ३ फ्लॅट फोडले

कणकवलीत एका बंगल्यासह ३ फ्लॅट फोडले

*कोकण Express*

*कणकवलीत एका बंगल्यासह ३ फ्लॅट फोडले*

*कपाटे उचकटून लाखोंची रक्कम लंपास
दोन दीवस चोरट्यांचा धुमाकूळ*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहरात चोरट्यांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. शुक्रवार ६ नोव्हेंबरला मध्यरात्री कणकवली शहरातील एका बंगल्यासह, ३ फ्लॅट चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरी झालेल्या घटनांनंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बंद फ्लॅट व बंगला लक्ष करुन चोरट्यांनी पुन्हा चोरीचे सत्र सुरु केले आहे.

कणकवली शहरातील जळकेवाडी येथील पत्रकार सदनामधील रुम नंबर ४ भालचंद्र बाजीराव साटम यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी ८० हजारांची रोख रक्कम लंपास केली.तसेच चांदीच्या साखळ्या व भांडी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे.तसेच श्रीराम अपार्टमेंट मधील मनीषा शशिकांत गावकर रूम नंबर ३१८ नाथ पैनगर कणकवली यांचा फ्लॅट फोडला. घरात ऑपरेशन करण्यासाठी ठेवलेली ७० हजाराची रक्कम चोरट्यांनी लंपास केली.दोन्ही फ्लॅट मध्ये कपाट उचकटून चोरट्यांनी चोरी केली.

तसेच श्रीराम अपार्टमेंटमधील बी विंग मध्ये बाळकृष्ण लक्ष्मण सावंत सदर बोरवली यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे. त्याचबरोबर शिवनेरी महापर्व बंगला चोरट्यांनी फोडला. मालक उदय शिवाजी सावंत असून ते सध्या पुण्याला आहेत. या बंगल्यातही चोरीचा प्रयत्न त्यांनी केला आहे.एकूण चार ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून रोख व चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. चोरीची घटना झाल्याचे समजताच कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कदम, उपनिरीक्षक बापू खरात,पोलीस हवालदार के.के.मेठेयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.तसेच श्वान पथका व्दारे चोरांचा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!