*कोकण Express*
*▪️कितीही प्रयत्न केले तरी संप मागे घेतला जाणार नाही*
राज्य शासनाने एस. टी. बस कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी संप मागे घेतला जाणार नाही भूमिका एस. टी. बस आगारातील संपामध्ये सहभागी झालेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांची असल्याचे बाबाजी अणावकर यांनी सांगितले.
एस. टी. बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना पगार वाढ दिली जाईल संप मागे घ्या अशी विनंती केली याबाबत कुडाळ एस. टी. बस आगारातील बस कर्मचारी बाबाजी अणावकर यांनी सांगितले की एसटी बस कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडून हा संप मोडण्याचा प्रयत्न परिवहन मंत्री अनिल परब करीत आहेत नव्याने एसटी बसमध्ये नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची पगारात वाढ तर जुन्या कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपयांची वाढ अशी तफावत पगार वाढ करून कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे मात्र या राज्य सरकारच्या धोरणाला कर्मचारी बळी पडणार नाही कर्मचारी अजूनही ठाम आहे लढा विलगीकरणाचा यशस्वी केअर केल्याशिवाय कर्मचारी स्वस्त बसणार नाही संप मोडीत काढण्यासाठी सगळी अस्त्रे वापरली आहेत आणि अजूनही वापरणार आहेत पण जोपर्यंत विलगीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही असा इशारा एसटी बस कर्मचारी बाबाजी अणावकर यांनी दिला.
दोन करार झालेले नाहीत, ही पगार वाढ म्हणजे वाटाण्याच्या अक्षता
यावेळी एसटी बस कर्मचारी दिनेश शिरवळकर यांनी सांगितले की सातत्याने एसटी बस कर्मचाऱ्यांना राज्य शासन धमक्या देऊन हा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे आता दिलेली पगारवाढ ही म्हणजे पाणी पुसण्याचे काम या सरकारने केले आहे एसटी बस महामंडळाचे दोन करार सरकार सोबत झालेले नाहीत या करारामध्ये पगार वाढ ज्या पटीने होणार होती त्या पटीत आता केलेली पगारवाढ म्हणजे वाटाण्याच्या अक्षता दिल्याप्रमाणे आहे जर दोन करार झाले असते तर आता दिल्या जाणाऱ्या पगार वाढी पेक्षा पगारात वाढ झाली असती पगार वाढ करतो म्हणून सांगून पाणी पुसण्याचे काम हे सरकार करीत आहे त्यामुळे अशा आमिषांना कर्मचारी भुलणार नाही कर्मचारी आपल्या मताशी ठाम आहे तो संपात सहभागी होणार आणि संप असाच कायम राहणार जोपर्यंत कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर होत नाही तोपर्यंत त्यामुळे राज्य शासनाने संप मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी रोशन तेंडुलकर, गुरु वालावलकर, राजू कोरगावकर, विलास गोसावी, सुनील सामंत, राजू वंजारे, जी. जी. नाईक, हेमंत माळगावकर उपस्थित होते.