*कोकण Express*
*▪️माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून पिकुळे हायस्कूलच्या दहा विद्यार्थिनींना सायकल वाटप*
मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेशजी प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांचे सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत सायकल वाटप वितरण समारंभ धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुबंई संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे या प्रशालेमध्ये पार पडला.हा कार्यक्रम जिल्हा बँकेचे संचालक तथा शाळा समिती सदस्य श्री प्रकाश गवस पिकुळे सरपंच दिक्षा महालकर शाळा समिती सदस्य रामदास गवस आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुबंई संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे या प्रशालेच्या गरजू होतकरू गरीब दहा मुलींना सायकल वाटप करण्यात आले यासाठी भाजतीय जनता पक्ष तालुका दोडामार्ग तसेच शिक्षण व आरोग्य सभापती डॉ अनिषा दळवी जि प सिंधुदुर्ग आणि खासदार सुरेश प्रभू यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांनी आभार व्यक्त केले तर सरपंच दिक्षा महालकर यांनी जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबविले व त्यानी बचतगट माध्यमातून अनेकांना रोजगार दिला व व्यासपीठ उपलब्ध करून दिले अशा कार्यक्रमामुळे आपल्याला सरपंच होता आले असे सांगितले त्यानी भविष्यात चांगले उपक्रम हाती घ्यावे त्याला नेहमीच सहकार्य करण्यात येईल असे स्पष्ट केले त्याचबरोबर अनेक उपक्रम त्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे त्याचाही लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी शाळा समिती सदस्य तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गवस यांनी सांगितले की आताच्या सावित्रीच्या लेकी यापुढे सर्वच क्षेत्रात चमकल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत देशात पुरुषांच्या बरोबरीने महिला आघाडी वर आहे हे आता दिसून येत आहे देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हजारी पुरुषांच्या तुलनेत 928 महिला होत्या सद्यस्थितीत1020 महिला आहेत त्यामुळे मुलींनी चांगले शिक्षण घेऊन उज्जल यश मिळवले पाहिजे सायकल बँक कार्यक्रम व वाटप स्तुत्य उपक्रम असून यापुढे इतर विदयार्थी वर्गासाठी स्लो सायकल स्पर्धा आयोजित कराव्यात जेणे करून स्पर्धा वाढेल शाळेत शिकत असताना कुठे थांबले पाहिजे.
आपल्याला कोण बनायचे आहे हे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यानी विदयार्थी वर्गाला केले यावेळी पिकुळे सरपंच दिक्षा महालकर शाळा समिती सदस्य रामदास गवस मुख्याध्यापिका श्रीम स्नेहल गवस जेष्ठ शिक्षक एन पी कांबळे श्री अशोक आबुलकर श्रीम अनुजा सावंत श्रीम सीमा देऊलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल गवस तर सुत्रसंचलन सीमा देऊलकर व आभार निवृत्ती कांबळे यांनी मानले यावेळी परीसरातील पालक विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.