*कोकण Express*
*▪️कै.सिताराम( आबा) सखाराम तर्फे सर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कै. सिताराम( आबा) तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट जांभवडे बामणवाडीच्या वतीने प्रथमच सुरू केलेले कै. सिताराम( आबा) सखाराम तर्फे सर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार आज सरांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार जांभवडे पंचक्रोशी मर्यादित असून अनेक वर्षे शैक्षणिक व सामाजिक कार्य केलेले श्री. बाळासाहेब गणपती निंबाळकर, न्यु शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज जांभवडे आणि श्री. श्रीकांत नामदेव खांडेकर, प्राथमिक शाळा भरणी आगरवाडी हे पहिल्या पुरस्काकारांचे मानकरी ठरले आहेत. ट्रस्टच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सदर पुरस्कार सन्मानपूर्वक त्यांना विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत. जांभवडे हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक कै. सिताराम तर्फे सर हे जांभवडे पंचक्रोशीतील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते.गरजू विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना नेहमीच मदतीचा हात देत असत. त्यांच्या निधनानंतर त्यांचे राहिलेले शैक्षणिक , सामाजिक व सांस्कृतिक कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी तर्फे परिवाराने चॅरिटेबल ट्रस्ट निर्माण करुन त्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांसाठी वैद्यकीय, शैक्षणिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील नागरिकांसाठी जांभवडे पंचक्रोशीतील नागरिकांच्या लोकसहभागातून एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे आज कै. आबा तर्फे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पंचक्रोशीतील दोन शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर करुन सन्मानित केले आहे.तसेच कु. रुपाली रामचंद्र सावंत (जांभवडे)व कु. पूजा संतोष तांबे (सोनवडे) या नर्सिंग शिकणाऱ्या दोन गरजू मुलीना प्रत्येकी 5000₹शैक्षणिक मदत दिली. यानंतरही ट्रस्टच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांसाठी वैद्यकीय, शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातील. असे ट्रस्टचे सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे यांनी सांगितले.