*कोकण Express*
*▪️दलित पँथर सुवर्णमहोत्सव कृती समिती सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी सरीता चव्हाण तर सचीव म्हणून संतोष पाटणकर यांची एकमताने निवड*
*कासार्डे ः संजय भोसले*
दलीत पँथर सुवर्ण महोत्सव समीती महाराष्ट्र राज्य समितीचे निमंत्रक काॅ सुभाष मोरे यांच्या उपस्थितीत कणकवली बुद्ध विहार येथे नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्गातील आंबेडकरवादी आणि पुरोगामी सामाजिक संघटनांच्या प्रतीनिधींच्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी संघटनेची दुसरी बैठक दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी सायं 3:30 वा छ शाहू महाराज(हिंद छत्रालाय)वसतिगृह टेम्बवाडी,कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
दलित पँथर सुवर्णमहोत्सव समिती, महाराष्ट्र राज्यसमितीचे
निमंत्रक कॉ सुबोध मोरे यांच्या उपस्थितीत कणकवली बौद्ध विहार येथे दि 20 नोव्हेंबर रोजी सायं 3:30 वा सिंधुदुर्गातील आंबेडकरवादी आणि पुरोगामी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीमध्ये कॉ.सुबोध मोरे(मुंबई)यांनी दलित पँथर या संघटनेने महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक आणि एकूणच वैचारिक विश्वामध्ये दिलेल्या योगदानासंदर्भात मार्गदर्शन केले आणि भूमिका स्पष्ट केली.उपस्तीत सर्वच प्रतिनिधी-कार्यकर्ते यांच्याकडून या भूमिकेचे स्वागत करण्यात आले आणि जिल्हास्तरावर या भूमिकेच्या अनुषंगाने कृती कार्यक्रम ठरवण्यासंदर्भात चर्चा आणि अस्थायी कृती समिती स्थापन करण्यात आली.या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे चर्चा-मुद्दे मांडण्यात आले.
1)या बैठकीमध्ये अस्थायी कृती समिती स्थापन करण्यात आली
2)तालुका स्तरीय संघटनांपर्यंत ही भूमिका घेऊन जाण्याच्या दृष्टीने संपर्क करने
3)जिल्यातील साहित्य संघटना,कार्यकर्ते-कवी- यांच्याशी संवाद साधून पँथरच्या निवडक कवितांच्या वाचनाचा एक कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये सादर करणे
4)नव्या पिढीला दलित पँथर या संघटनेचे व्यापक योगदान समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावरून मार्गदर्शक बोलवून तरुण विध्यार्थी,कार्यकर्ते यांचे शिबिर आयोजित करणे
5)दलित पँथरच्या योगदानाची चिकित्सक मांडणी करणाऱ्या पुस्तिका यावरील चर्चा,परिसंवादाचे आयोजन करण्या संदर्भात विचार विनिमय केल्या नंतर या बैठकीमध्ये अस्थायी कृती समिती गठीत करण्यात आली.ती पुढीलप्रमाणे:
🔹अध्यक्ष:सरिता चव्हाण
🔹उपाध्यक्ष:महेश पेडणेकर
🔹सचिव:संतोष पाटणकर
🔹सहसचिव:सुभाष कांबळे
🔹संघटक:सुदीप कांबळे,आनंद कुडाळकर,मधुकर मातोंडकर
अंकुश कदम,दत्ताराम निकम,डी. डी. कदम,प्रमिता तांबे,दीपक जाधव,निलेश कदम,बारक्या पवार
🔹सल्लागार:प्रा. विनोदसिंह पाटील
प्रा. सोमनाथ कदम
प्रा. भिसे
आयु.मोहन जाधव(पत्रकार)
