*कोकण Express*
*▪️नरडवे यवतेश्वर रस्त्याच्या कामाचा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ*
*▪️माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या प्रयत्नातून ४८ लाखाचा निधी मंजूर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नरडवे यवतेश्वर येथील पर्यायी रस्ता माजी जि प अध्यक्ष संदेश ऊर्फ गोटया सावंत यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. हा रस्ता होण्यासाठी तेथील ग्रामस्थांची अनेक वर्षे मागणी होती. त्यामुळे आता हा रस्ता मंजूर झाल्याने बऱ्याच वर्षाचा हा प्रश्न मार्गी लागल्याने विभागातील सर्व लोकांनी समाधान व्यक्त केले आहे अशी माहिती उपसरपंच सुरेश ढवळ यांनी दिली. जि प अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करणेत आला. या रस्त्यासाठी कार्यकारी अभियंता आंबडपाल यांचे कडून 48 लाख एवढी भरीव तरतुद मंजूर आहे. सदर कामाच्या भूमीपूजनाच्यावेळी संदेश सावंत, माजी जि.प सदस्य सुरेश ढवळ, माजी सरपंच अनिल ढवळ, माजी उपसरपंच गणपत सावंत, सदानंद सावंत कृषी समिती अध्यक्ष, संगीता सावंत, सिदधार्थ कदम, रिया वंजारे, सुभाष मेस्त्री, गणेश सावंत, राजेश सावंत, सुधाकर सावंत, मधूनाथ सावंत, संतोष राणे, भाई कदम रामनाथ नार्वेकर, संजय पवार संजय राणे, भाई बोभाटे व अनेक नरडवेतील ग्रामस्थ उपस्थित होते .