भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चा सिंधुदुर्ग यांच्यावतीने संविधान दिन सांगवी येथे उत्साहात साजरा

भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चा सिंधुदुर्ग यांच्यावतीने संविधान दिन सांगवी येथे उत्साहात साजरा

*कोकण Express*

*▪️भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चा सिंधुदुर्ग यांच्यावतीने संविधान दिन सांगवे येथे उत्साहात साजरा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती-जमाती मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने कणकवली तालुक्यातील सांगवे येथे संविधान दिन अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रम प्रसंगी भारत राष्ट्र म्हणून एक संघ राहण्यासाठी संविधानाचे असलेले महत्त्व, या भारताच्या सार्वभौम संविधानाप्रती एक सुजाण नागरिक म्हणून आपले असलेले कर्तव्य याबाबत संजना सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास श्री. उत्तम कदम यांनी आपले सविधानदिनाचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हास्तरीय कार्यक्रम प्रसंगी समाज कल्याण सभापती श्री अंकुश जाधव, सरपंच सांगवे मयुरी मुंज,पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष अनुसूचित जाती-जमाती मोर्चा गणेश तांबे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!