ओसरगाव येथे १ लाख १९ हजार रुपयांची दारू जप्त

ओसरगाव येथे १ लाख १९ हजार रुपयांची दारू जप्त

*कोकण  Express*

*▪️ओसरगाव येथे १ लाख १९ हजार रुपयांची दारू जप्त…*

*▪️एलसीबी पथकाची कारवाई : कलमठ मधील आरोपीवर गुन्हा दाखल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महामार्गावरील ओसरगाव तलावाजवळ बोलेरो गाडीतून गोवा बनावटीची दारू एलसीबी च्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा कारवाई करत जप्त केली. यात आरोपी गजानन रावजी जाधव (वय ४२ त्रिंबक – बौद्धवाडी, मालवण, सध्या राहणार नाडकर्णीनगर कलमठ – कणकवली) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री उशीरा ही कारवाई केली. या कारवाईत १ लाख १९ हजार ४०० रुपयांची गोवा बनावटीची दारू व दोन लाखाची बोलेरो जप्त करण्यात आली. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हेड कॉन्स्टेबल प्रवीण वालावलकर यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दाखल फिर्यादीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाची कणकवलीत गस्त सुरु असताना ओसरगाव तलावा जवळ बोलेरो गाडी संशयास्पद रित्या उभी असलेली आढळली. या गाडी ची तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीची दारू असल्याचे आढळून आले. या गाडीमध्ये ५७ हजार रुपये किमतीचे व्हिस्की चे १९ बॉक्स मध्ये २२८ बाटल्या व ६२ हजार चारशे रुपये किमतीच्या १३ बॉक्समध्ये ६२४ बाटल्या या गाडीत असल्याचे आढळून आले. दारूने भरलेली बोलेरो गाडी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कणकवलीत पोलिसात आणून पंचांसमक्ष पंचनामा केला. व आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक एम एम शेळके, सी आर पालकर, गुरुनाथ कोयंडे, प्रवीण वालावलकर यांच्या पथकाने केली. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!