*▪️खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक व बाबुराव धुरी यांच्या उपस्थितीत हाती बांधले शिवबंधन*
*दोडामार्ग ः लहू परब*
कसई – दोडामार्गची नगरपंचायत निवडणूक जाहीर झाली असून आता अनेक पक्षात इनकमिंग आउट गोईगचा खेळ रंगताना दिसत आहे. यात भाजपा माजी शहरप्रमुख तथा शक्ती केंद्र प्रमुख योगेश महाले यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला असून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दोडामार्ग तालुकप्रमुख बाबुराव धुरी, माजी उपसभापती आनंद रेडकर यांच्या उपस्थितीत शिवबंधन हातात बांधले. त्याचबरोबर उद्योजक विजय मोहिते व सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.