*कोकण Express*
*▪️फोंडाघाट महाविद्यालयात संविधान दिन साजरा*
*▪️संविधानामुळेच मानवतेचे रक्षण ; लेफ्टनंट डॉ. ताडेराव*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचा आजीवन अध्ययन विस्तार विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख वक्ते लेफ्टनंट डॉ. ताडेराव म्हणाले भारत हा असा जगातला एकमेव देश असेल की ज्या देशाने कोणावरही हल्ला केलेला नाही परंतु भारतावर अनेकांनी हल्ले केले. ब्रिटिश राजवटीत अनेक कायदे मंजूर झाले. स्वातंत्र्यानंतर भारताने संविधानाचा स्वीकार केला. संविधानामुळेच मानवतेचे रक्षण हाेत अाहे.
संविधान हा भारतीयांना मिळालेला अमूल्य ठेवा अाहे. अनेक परकीय तत्त्वज्ञ म्हणतात की, भारतातून नेण्यासारखे सर्वात अमूल्य म्हणजे भारतीय संविधान आहे. संविधानामुळे देशाच्या विविध परंपरा, संस्कृती, सण, समारंभ, धर्म, जाती, जमाती अशा विविधता एकसंघपणे बांधणी करून संपूर्ण देश एकसंघ करण्याचे काम संविधानाने केले आहे. संविधानाची सुरुवातच आम्ही भारतीय लोक अशी असून हे संविधान स्वतःप्रत अर्पित केलेेले आहे.
डॉ. संतोष रायबोले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, संविधान हा शब्द मानवतेचा संदेश देणारा शब्द आहे. डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणेवर भर दिला आणि त्यानंतरच मानवी अधिकाराचा विचार या देशात होऊ लागला. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेले देशात मताधिकार हा फार मोठा अधिकार प्राप्त झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बालाजी सुरवसे तर आभार प्रा. संतोष आखाडे यांनी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.