*कोकण Express*
*▪️कणकवली महाविद्यालयात शिक्षण सहसंचालकांच्या उपस्थितीत कार्यशाळा…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्था पदाधिकारी यांच्या अडचणी सोडविण्यास संदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्या संकल्पनेतून उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत ही कार्यशाळा होत आहे. या प्रसंगी विभागीय सहसंचालक डॉ.संजय जगताप, प्रशासन अधिकारी ज्ञानदा कदम, लेखाधिकारी चंद्रशेखर खामकर आदीसह उच्च शिक्षण सहसंचालक पनवेल यांच्या कार्यालयातील कर्मचारी स्वतः उपस्थित राहून आलेल्या अडी-अडचणी सोडविण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहे .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील शिक्षण संस्था
पदाधिकारी,प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थ्यां व संबंधितांनी आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या संदर्भातील सर्व कागदपत्रासह ओळखपत्र व लसीकरण प्रमाणपत्र घेऊन वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. चौगुले यांनी केले आहे.