भाजपने राजकीय वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करू नये

भाजपने राजकीय वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करू नये

*कोकण Express*

*भाजपने राजकीय वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करू नये : यशवंत परब*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

राज्यमंत्री सत्तार यांनी रेडी बंदर येथे मेरिताईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना आम्ही काय किराणा दुकान वाटलो काय असा शब्दप्रयोग केला. यात त्याचा किराणा दुकानदार यांची अहवेलना किंवा अपमान करण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे भाजप नेत्यांनी या गोष्टीचे भांडवल करून जिल्ह्यातील राजकीय वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना ही मेहमीच व्यापारी यांच्या पाठीशी नेहमी उभी राहिली आहे आणि यापुढेही राहणार. अशी प्रतिक्रिया शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी व्यक्त केली आहे.

श्री परब बोलताना म्हणाले की, राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्ह्यातील महसूल, ग्रामपंचायत, बंदर विषयक विविध विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि विविध कामाबद्दल आढावा घेण्यात आला. दरम्यान पूर्वनियोजित दौऱ्याप्रमाणे रेडी येथील पोर्ट ला त्यांनी भेट दिली. त्यावेळी याठिकाणी बंदर अधिकारी अनुपस्थित असल्याने संबंधित मेरिताईम बोर्ड यांच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावर फोन वरून संपर्क साधत ते भडकले. आणि यावेळी त्यांनी आम्ही किराणा दुकान वाटलो का असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, त्यांचा हेतू हा किराणा दुकानदारांची अहवेलना किंवा अपमान करण्याचा नव्हता. किराणा व्यापारी हा सर्वसामान्य जनतेला पोशिंदा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे भांडवल करून भाजप नेत्यांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना ही नेहमी इतर वेळी व लॉकडाऊनच्या काळातही किराणा दुकानदार व व्यापारी यांच्या पाठीशी सदैव उभी राहिली आहे. तरी भाजप ने शिवसेना व व्यापारी यांच्यातील संबंध कलुषित करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच भाजप चे आताचे नेते नारायण राणे हे त्यावेळी जठार यांना गटार का बोलत होते हे आता जठार यांनी जनतेला दाखवून दिले आहे. यामुळे त्यांना शेण खाण्याची सवय असून त्यांची अवस्थाही भ्रमिष्टासारखी झाली आहे. अशा शब्दात तालुकाप्रमुख परब यांनी जठार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केलेल्या टिकेचाही समाचार घेतला. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा पदाधिकारी सचिन वालावलकर, शहर समन्वयक विवेक आरोलकर, सुरेश भोसले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!