*कोकण Express*
*▪️नांदगाव तिठ्यावर चिखलाचे साम्राज्य ;चिखलामुळे अपघात होण्याची शक्यता*
*▪️नांदगाव तिठा येथील काम लवकर पूर्ण करुन रस्ता स्वच्छ करावा – जनतेतून होतोय मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नांदगाव येथील हायवेच्या अर्धवट स्थितीत कामाबाबत आंदोलन झाल्यानंतर गटार व्यवस्थापन चे हायवे कंपनीने काम हाती घेतले आहे. एक साईट चा सर्व्हिस रोड पूर्ण करण्यात आल्याने तेथे गटाराचे काम पूर्ण केले जात आहे. यातच गेले काही दिवस पाऊस सुरू झाला असून तसेच गटार व्यवस्थापन साठी चरी खोदण्यात आली आहे यामुळे मातीचा ढीग रस्त्यावर उतरून पाऊस सुरू असल्याने पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे.
नांदगाव तिठा मध्यभागी देवगड निपाणी मार्ग असल्याने येथे ही यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे या चिखलामुळे दुचाकीवरून जाणे सोडाच तर तेथे पायी चालत जाण्यास कसरत करावी लागत आहे.या चिखलामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी नांदगाव तिठा येथील काम लवकर पूर्ण करुन रस्ता स्वच्छ करावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे.