आमदार दीपक केसरकर “गंगु तेली”, राणेंवर टिका नको

आमदार दीपक केसरकर “गंगु तेली”, राणेंवर टिका नको

*कोकण Express*

*▪️आमदार दीपक केसरकर “गंगु तेली”, राणेंवर टिका नको*

*▪️संजू परब; नगराध्यक्ष राणेंमुळेच झालात,अन्यथा आज दिसलाच नसता…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

नारायण राणे म्हणजे राजा “भोज” आहेत.तर आमदार दीपक केसरकर हे “गंगु” तेली आहेत.ते गद्दार आहेत. त्यामुळे त्यांनी राणेंवर बोलू नये.
दरम्यान तीन वेळा आमदार झालो असे म्हणणारे केसरकर राणेंमुळेच नगराध्यक्ष झाले हे त्यांनी विसरू नये. राणेंनी कार्यकर्त्यांना शपथ घातली नसती तर तुम्ही दिसलाच नसतात,असे त्यांनी सांगितले.श्री परब यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.

यावेळी नगरसेवक आनंद नेवगी,सुधीर आडीवरेकर,शहराध्यक्ष अजय गोंदावले,महेश पांचाळ,केतन आजगावकर, बंटी पुरोहित,अमित परब,विनोद सावंत आदी उपस्थित होते.

श्री परब पुढे म्हणाले,आमचा सरपंच तरी चांगले काम करतो मात्र केसरकरांना जमत नाही. असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. मात्र आमदार दीपक केसरकर खोटे बोलून जनतेला वेडे बनवायचे काम करीत आहेत. खोटे बोलणे हे केसरकर यांच्या रक्तातच आहे.त्यामुळे भोळ्याभाबड्या जनतेला खोटी आश्वासने देऊन आमदार झाले. तसेच सेना भाजपची युती असल्यामुळे ते आता आमदार आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले जोपर्यंत दीपक केसरकर आमदार आहेत. तो पर्यंत येथील हॉस्पिटल होणार नाही. केसरकरांनी आता संस्कृती बोलणे सोडून रोजगार कसा देता येईल,याचा विचार करावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून येथील पाचशे लोकांना भाजपच्या माध्यमातून आम्ही रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!