स्व. सुनिल तळेकर यांच्या २४व्या स्मृर्ती दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्व. सुनिल तळेकर यांच्या २४व्या स्मृर्ती दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन

*कोकण Express*

*▪️स्व. सुनिल तळेकर यांच्या २४व्या स्मृर्ती दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*कासार्डे  ः संजय भोसले*

तळेरे येथील सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट व स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय, याच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २६नोव्हेंबर रोजी स्व. सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृर्ती दिनानिमित्त विविध शैक्षणिक,सामाजिक आणि कृषी विषयक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१ सकाळी ९:३० वा रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स.१०:०० वा. इयत्ता १० वी व १२ वी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार असून त्याच वेळी आकाश कंदील स्पर्धेमध्ये यशस्वीतांचा बक्षिस वितरण समारंभही आयोजित करण्यात आला आहे.

तसेच श्री. विठ्ठल मंदिर तळेरे गावठण येथे श्री.खर्जादेवी दुध उत्पादक संस्था आणि ज्येष्ठ नागरिक संघ तळेरे यांच्यावतीने ११.०० वा. दुग्ध व्यवसाय व शेती विषयक मार्गदर्शन होणार असून यासाठी प्रा. भास्कर काजरेकर (शेती) , डाॅ.देसाई (दुग्ध व्यवसाय) बहुमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे.यानतंरदु.१.०० वा. विशेष प्रविण्य प्राप्त विद्यार्थी समाजसेवी व्यक्तींचा सत्कार सोहळ्यासह सहभोजनाचे होणार आहे.या कार्यक्रमासाडी श्री नितिन तळेकर ,दारुम,राजू वळंजू, डाॅ. अभिजित कणसे, विनय पावसकर याचे विशेष सहकार्य लाभले असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. सुनिल तळेकर चारीटेबल ट्रस्ट व स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय, तळेरे याच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!