*कोकण Express*
*शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या वतीने अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसााना संदर्भात महाराष्ट्र राज्याचे लॉटरी आयुक्त श्री. ई. रवींद्रन यांंची घेतली भेट*
*मुंबई*
शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लॉटरी आयुक्त श्री. ई. रवींद्रन यांची भेट घेऊन अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदतीसाठी विशेष सोडत काढावी, पेपर लॉटरी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलीस व महानगरपालिके पासून संरक्षण मिळण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, विक्रेत्यांनची गैरसोय होऊ नये म्हणून व विक्रीत वाढ होण्यासाठी एपीएमसी मार्केट वाशी येथील कार्यालय मुंबई येथे उपलब्ध करावा व कार्यालयातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना कायम करावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी अध्यक्ष व अंबरनाथ विधानसभेचे संपर्कप्रमुख मनोज वारंग, सरचिटणीस सिद्धेश पाटील, खजिनदार अविनाश सावंत व विश्वजीत मयेकर उपस्थित होते.