*कोकण Express*
*▪️सिंधुदुर्ग शॉपिंग महोत्सव २०२१ आणि फूड फेस्टिव्हलचे दिमाखदार उदघाटन*
*▪️अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अशा महोत्सवाची गरज : निलेश राणे*
छोट्या उद्योगांना उभारी देण्यासाठी शॉपिंग फेस्टिव्हल सारख्या महोत्सवांची आवश्यकता असते, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी केले. ते कुडाळ येथील सिंधुदुर्ग शॉपिंग महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. छोट्या उद्योगांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या महोत्सवाचे उद्घाटननिलेश राणे यांच्या हस्ते झाले.
कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील डॉन बॉस्कोच्या मैदानावर सिंधुदुर्ग शॉपिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उदघाटन प्रसंगी मंचावर जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे, कुडाळ तालुका पंचायत समिती सभापती सौ नूतन आईर, तालुकाध्यक्ष विनायक राणे,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, माजी सभापती मोहन सावंत,जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर,जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, तसेच शहर अध्यक्ष राकेश कांदे,युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रुपेश कानडे,पप्या तवटे,महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर,राकेश नेमळेकर,निलेश परब,चेतन धुरी,सौ मुक्ती परब,सौ.रेवती राणे,चंदन कांबळी,रुपेश बिडये,विश्वास पांगुळ,अवधूत सामंत नागेश नेमळेकर उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की, कोरोना काळामध्ये सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटलेली होती. या काळामध्ये जो फटका बसला तो छोट्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला. पण या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारचे छोटे महोत्सव घेऊन या छोट्या व्यापाऱ्यांना उभारी देण्याचे काम केले आणि त्याच पार्श्वभूमीवर कुडाळ येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जो महोत्सव भरवला आहे या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक आले आहेत. छोट्या व्यापारामुळे बाजारपेठांमध्ये आर्थिक सुबत्ता राहते. बाजारपेठेमध्ये चलन हे छोट्या व्यापाऱ्यांमुळेच सुरू राहते. त्या छोट्या व्यापाऱ्यांना याठिकाणी महोत्सवाच्या माध्यमातून एकत्र आणले गेले, हे खरोखर कौतुकास्पद आहे. आर्थिक गणिते छोट्या व्यापाऱ्यांवर अवलंबून असतात. छोट्या उद्योगामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.
या महोत्सवाचे आयोजन विनायक राणे, राकेश नेमळेकर, राकेश कांदे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी मानले.