*कोकण Express*
*▪️वाहन अपघातात मयत बिडये कुटुंबीयांना 36 लाख रुपये नुकसान भरपाई!*
*▪️अर्जदाराच्या वतीने ॲडव्होकेट दीपक अंधारी यांनी पाहिले काम…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सन 2018 च्या जून मध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने मुंबई येथे फणस विक्री करण्याकरिता नांदगाव, तालुका कणकवली येथील कै.देवेंद्र बिडये व कै.जयवंत बिडये हे आयशर टेम्पो क्रमांक एम एच 07 एक्स 1790 घेऊन जात होते. सदर टेम्पो मुंबई-गोवा हायवेवर पाली गावाजवळ आला असता, टेम्पो चालक अनिकेत बिडये याला टेम्पो नियंत्रित न करता आल्याने तो पलटी झाला. त्यावेळी झालेल्या अपघातात ट्रक मध्ये भरलेल्या फणसा खाली चिरडून कै.देवेंद्र व कै.जयवंत यांचा दुर्दैवीरित्या अंत झाला.
देवेंद्र हे रिक्षा चालक व दुकान व्यवसायिक होते देवेंद्र यांच्या वारसा च्या वतीने सिंधुदुर्ग येथील मोटर अपघात वाद न्यायाधिकरणात श्रीमती पूजा देवेंद्र बिडये यांनी ॲडव्होकेट दीपक अंधारी यांचेमार्फत नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. सदर दावा मंजूर होऊन रक्कम रुपये18 लाख एवढी व्याजासह नुकसान भरपाई वारसाना देण्याचा आदेश मोटर अपघात दावा न्यायाधिकरण यांनी दिला आहे.
तसेच कै जयवंत हे मंडप डेकोरेटर व दुकान व्यवसायिक होते कै.जयवंत त्यांच्या वारसांच्या वतीने न्यायाधिकरणात श्रीमती जागृती जयवंत बिडये यांनी ॲडव्होकेट दीपक अंधारी यांचेमार्फत नुकसानभरपाई मिळण्याकरिता दावा दाखल केला होता. सदर दावा मंजूर होऊन रक्कम रुपये 18 लाख 50 हजार एवढी व्याजासह नुकसानभरपाई देण्याचा आदेश मोटर अपघात दावा न्यायाधिकरण सिंधुदुर्ग यांनी दिला आहे.
वाहन अपघाताचे वेळी ट्रक चा विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडे उतरलेला होता. त्यामुळे सदर वाहन भरपाई देण्यासाठी ट्रकचे चालक, मालक, विमा कंपनी यांना संयुक्तरित्या जबाबदार धरण्यात आले आहे. अर्जदार यांचे वतीने ॲडव्होकेट दीपक अंधारी कणकवली यांनी काम पाहिले.