स्मृतीदिनानिमित्त शिवडाव येथील कै.सत्यविजय भिसे मित्रमंडळामार्फत विविध समाज विधायक उपक्रम

स्मृतीदिनानिमित्त शिवडाव येथील कै.सत्यविजय भिसे मित्रमंडळामार्फत विविध समाज विधायक उपक्रम

*कोकण  Express*

*▪️स्मृतीदिनानिमित्त शिवडाव येथील कै.सत्यविजय भिसे मित्रमंडळामार्फत विविध समाज विधायक उपक्रम*

*कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळ शिवडाव यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांचा १९ वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, संदेश पटेल, सोमा घाडीगावकर, बाळा भिसे, कळसुली सरपंच साक्षी परब, शिवडाव सरपंच वनिता जाधव, विलास गावकर, मित्रमंडळाचे अध्यक्ष सत्यविजय जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अभय गावकर, भास्कर राणे, श्रीकांत तेली, संजय पारकर, बाळू पारकर, अरविंद दळवी, रविकांत सावंत, दादा भोगले, लवू पवार, चंदू परब, सुशांत दळवी, नितीन गावकर, नंदू परब, आणा नानचे, राजू पाताडे, लवू परब, जय शेट्ये, अमित सावंत, रोहित राणे, नितीन हरमलकर, सुनील हरमलकर, नितीश भिसे, महेश शिरसाठ, प्रशांत कुडतरकर, आणा सदडेकर, संजय सावंत, दाजी कोरगावकर, दीपक कोरगावकर, सुनील राऊत, गणेश शिवडावकर, संतोष दळवी, उत्तम राणे, जयसिंग राणे, दर्शना शिरसाट, दादा भोगले, आदींसह सत्यविजय भिसे प्रेमी उपस्थित होते. या स्मृतीदिनाचे औचित्य साधून सलग १९ व्या वर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी सुमारे ५२ दात्यांनी रक्तदान करत भिसे यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी भिसे व सावंत कुटुंबियांच्या कौटुंबिक नात्यातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले २००२ मध्ये ही घटना घडली त्यावेळी आम्ही वेगळ्या प्रवाहात होतो. तेव्हाच्या वाईट प्रवृत्तीला आमचा विरोध होता मात्र दहशतीचे वातावरण असल्याने ती दहशत मोडून काढण्याची ताकत आमच्यात नव्हती त्यासाठी आपण भिसे कुटुंबीय व त्यांच्या प्रेमींची मनापासून माफी मागतो. एवढा प्रसंग ओढवून देखील भिसे कुटुंबियानीं आमच्या सोबत ऋणानुबंध कायम ठेवले होते व आजही आहेत. आजच्या तरुण पिढीने कै.सत्यविजय भिसे यांचा आदर्श घ्यावा. कारण त्याकाळी अरे ला कारे म्हणण्याची धमक भिसे यांनी ठेवली होती. व ते कोणत्याही धमकीला भिऊन माघारी फिरले न होते. आपल्याला काय मिळेल याचा विचार न करता प्रामाणिक पणे सत्यविजय भिसे यांनी काम केले. म्हणून आज १९ वर्षे त्यांच्या स्मृती जिवंत आहेत.
यावेळी सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने वारकरी सांप्रदायाच्या हरी भक्तांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तर उपस्थित पंचक्रोशीतील महिलांना साडी वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!