*कोकण Express*
*▪️सावंतवाडी शहरात सुरू असलेले जिओचे काम रोखले*
*▪️राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व राणे समर्थक संतोष गावस आक्रमक*
*सावंतवाडी ःः प्रतिनिधी*
सावंतवाडी येथे सुरू असलेल्या जिओ खोदाई काम चुकीच्या पद्धतीने काम सुरू असून, या विरोधात आज कट्टर राणे समर्थक संतोष गावस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आणि पदाधिकारी हे आक्रमक झाले असून, संचयनी येथील सुरू असलेले काम बंद पाडले आहे.
यावेळी सर्वांनीच पोलीस स्थानकात धाव घेत काम थाबवण्याबाबत तसेच दुसऱ्या बाजूला खोदाई करू देणार नाही असे निवेदन दिले आहे. तर यावेळी शहरात कुठेच खोदाई करू देणार नाही. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला आहे.