पंचायत समिती कणकवली नूतन प्रशासकीय इमारत उदघाटन सोहळा मंगळवारी

पंचायत समिती कणकवली नूतन प्रशासकीय इमारत उदघाटन सोहळा मंगळवारी

*कोकण Express*

*▪️पंचायत समिती कणकवली नूतन प्रशासकीय इमारत उदघाटन सोहळा मंगळवारी*

*▪️केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पंचायत समिती च्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उदघाटन सोहळा मंगळवार दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी.10.30 वाजता केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे ( सुक्ष्म,लघु व माध्यम उद्योग भारत सरकार) यांचे शुभ हस्ते होणार आहे.पंचायत समिती कणकवली च्या नूतन इमारतीचे स्वप्न नारायण राणे यांचे प्रयत्नातून पूर्ण होत आहे.या इमारतीसाठी सन 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सन्मा.देवेंद्र फडवणीस साहेब यांचे माध्यमातून महाराष्ट्र शासनकडुन निधी प्राप्त झाला व सन 2017 मध्ये सदर इमारतीचे भूमिपूजन झाले व हे स्वप्न साकार होत आहे.
पंचायत समिती कणकवली ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ज्यामध्ये पंचायत समीतीचे सर्व विभाग एकाच छताखाली येतील अशी ही पहिलीच इमारत आहे.ग्रामीण भागातील जनतेला एकाच ठिकाणी आपली प्रशासकीय कामे करता यावीत त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत देता यावा तसेच पदाधिकारी यांना अधिकारी,कर्मचारी यांच्याशी थेट व वेळेत संपर्क साधून गोरगरीब जनतेची कामे वेळेत पूर्ण करता यावीत या उद्देशाने या प्रशासकीय इमारतीची रचना करणेत आलेली आहे.पंचायत समिती कणकवली ने आजपर्यँत सर्व क्षेत्रात मोठी भरारी घेतलेली आहे.आणि यातीलच ही नवीन प्रशासकीय इमारत हा एक भाग असून यासाठी सर्व आजी ,माझी पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.आणि यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून ही भव्य प्रशासकीय इमारत आज दिमाखात उभी आहे.उदघाटन दिवशी खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहेत
सकाळी 10.00 वाजता सत्यनारायण महापूजा स.10.30 वाजता मान्यवरांचे हस्ते उदघाटन 1.30 महाप्रसाद साय.4.30 वाजता डबलबारी असे कार्यक्रम होणार आहेत तरी ह्या सर्व कार्यक्रमांचा लाभ तालुक्यातील लोकांनी घ्यावा असे आवाहन सभापती मनोज रावराणे उपसभापती प्रकाश पारकर यांनी केले आहेे

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!