*कोकण Express*
*▪️कणकवलीत “किलबिल जल्लोष” ४ डिसेंबरला…!*
*▪️ऑर्केस्ट्रा, महिला जादूगार, खाऊगल्लीचे खास आकर्षण…!*
*▪️समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन…!*
*▪️उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने कणकवलीत “किलबिल जल्लोष ” लहान मुलांसाठी ४ डिसेंबरला होणार आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या आईचे निधन झाल्याने हा कार्यक्रम पुढे घेण्यात आला आहे.कणकवली गणपती साना येथे हा कार्यक्रम होईल.या कार्यक्रमाचे उद्घाटन आ.नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी ५ होणार आहे.जादूगार सुचित्रा इंदूलकर(मुबंई -पुणे) यांचे जादूचे प्रयोग असतील,तर ऑर्केस्ट्रामध्ये गायक सौरभ दप्तरदार गायन करणार आहेत.खाऊगल्लीचे खास आकर्षण असणार आहे.
हा कार्यक्रम बाल दिनाचे औचित्य साधून केला जाणार आहे.एक दिवस खाऊ गल्ली असणार आहे.लहान मुले व सर्वांसाठी ऑर्केस्ट्रा असरणार आहे,गायक सौरभ दप्तरदार असेल.लहान मुलांसाठी जादूचा प्रयोग असणार आहेत.खेळणी व ८ कार्टून आहेत,मुलांना चॉकलेट देतील. विविध प्रकारचे स्टाँल लागतील,त्यांना मोफत खुर्च्या,टेबल आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत.५०० लहान मुलांना आकर्षक गिप्ट असणार आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आस्वाद घेता येणार आहे. कार्यक्रम ६ वाजता ते १० वाजता होईल.लहान मुलांना आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.दोन सेल्फी पॉईंट ठेवण्यात येणार आहे.लहान मुलांना मजा मस्ती करता येणार आहे.पालक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन बंडू हर्णे यांनी केले.
यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,गटनेते संजय कामतेकर, किशोर राणे,अभिजित मुसळे,महेश सावंत,अजय गागण आदी उपस्थित होते.