गोवा बनावटीच्या दारू तस्करीवर राज्य उत्पादनाची कारवाई

गोवा बनावटीच्या दारू तस्करीवर राज्य उत्पादनाची कारवाई

*कोकण Express*

*▪️गोवा बनावटीच्या दारू तस्करीवर राज्य उत्पादनाची कारवाई*

*▪️इन्सुली चेकनाक्यावर 20 लाखांच्या दारुसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त*

*बांदा  ः प्रतिनिधी*

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एकाला आज राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई आज इन्सुली तपासणी नाक्यावर करण्यात आली. यात तब्बल १९ लाख ९८ हजाराच्या दारूसह ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत बाबत माहिती अशी की, कंटेनर मधून बेकायदा दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, उपअधीक्षक आर व इंगळे, निरीक्षक प्रभात सावंत, दुय्यम निरीक्षक किरण बिरादार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान रमाकांत ठाकूर, प्रसाद माळी, जीवन शिर्के, शिवशंकर मुपडे, संदीप कदम यांच्या पथकाने इन्सुली तपासणी नाक्यावर सापळा रचला होता.

इन्सुली तपासणी नाक्यावर कंटेनर (एमएच ०४ जेयु २८४७) तपासणीसाठी थांबविण्यात आला. कंटेनरच्या मागील हौद्यात पीठाने भरलेली ५० किलो मापाची ११ पोटी भरण्यात आली होती. त्याच्या मागे गोवा बनावटीच्या दारूचे खोके भरण्यात आले होते. पथकाने ७५० मिली मापाचे ६४ खोके, १८० मिली मापाचे १७१ खोके असा एकूण १९ लाख ९८ हजार ६०० रुपये किमतीची दारू व बारा लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त केला. अधिक तपास दुय्यम निरीक्षक तानाजी पायील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!