कणकवलीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या वर्कशॉपला आग

कणकवलीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या वर्कशॉपला आग

*कोकण  Express*

*कणकवलीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या वर्कशॉपला आग*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शहरातील आचरा रोडवर असलेल्या एका इमारतीतील इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या वर्कशॉपच्या गाळ्यात साहित्याला लागलेल्या आगीत पुजारी इलेक्ट्रॉनिक्स चे मालक अशोक पुजारी यांच्या दुकानात दुरुस्तीसाठी आलेले फ्रिज, एसी जळून नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. कणकवलीत आचरा रोडवर पुजारी इलेक्ट्रॉनिक्स हे अशोक पुजारी यांचे दुकान असून, त्या दुकानाच्या समोरील इमारतीच्या गाळ्यात पुजारी इलेक्ट्रॉनिक्समध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुरुस्तीचे वर्कशॉप आहे. दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कामगार पुजारी इलेक्ट्रॉनिक दुकानात असतानाच शॉर्टसर्किटने दुकानात वायरिंग जळून आग लागली. यादरम्यान काही कामानिमित्त वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांनी जाऊन शटर उघडले तेव्हा वर्कशॉप मधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर लगेच कणकवली नगरपंचायत च्या अग्निशमन बंबाला बोलावण्यात आले. व लगेच धावपळ करत बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीतील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली. नगरपंचायत चा अग्निशमन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाला अशी माहिती अशोक पुजारी यांनी दिली. या वर्कशॉपमध्ये अनेक एसी, फ्रीज व दुरुस्तीसाठी आलेल्या अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवलेल्या होत्या. या आगीत सुदैवाने मोठे नुकसान टाळले . या आगीत अशोक पुजारी यांची सुमारे ७० हजाराचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!