विद्या विहारच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

विद्या विहारच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

*कोकण Express*

*विद्या विहारच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*

*बांदा ः प्रतिनिधी*

विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस या विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना नीलेश परब मित्रमंडळ मुंबई व विजय सोनावळे यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, सावंतवाडी पंचायत समिती माजी उपसभापती संदीप नेमळेकर तसेच विजय सोनावळे, सोपान पवार, निशांत सोनावळे, दीपेश नारगे, प्रशांत नारगे, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत आदी मान्यवर उपस्थित होते. बाळा परब यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर शिक्षक सदाशिव धुपकर यांनी प्रस्तावित केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा नीलेश देऊलकर यांनी सांभाळत आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!