एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला कणकवली शहरातील रिक्षा व सहा आसनी मॅजिक चालक–मालकांनी दिलेल्या पाठिंब्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला कणकवली शहरातील रिक्षा व सहा आसनी मॅजिक चालक–मालकांनी दिलेल्या पाठिंब्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोकण Express*

*▪️एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला कणकवली शहरातील रिक्षा व सहा आसनी मॅजिक चालक–मालकांनी दिलेल्या पाठिंब्याला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*कणकवली ः प्रतिनिधी*

एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाला कणकवली शहरातील रिक्षा व सहा आसनी मॅजिक चालक – मालकांनी दिलेल्या पाठिंब्याला आज रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कणकवली शहरातील रिक्षा चालक- मालक संघटना व सहा आसनी मॅजिक संघटना यांनी रिक्षा व मॅजिक व्यवसाय बंद ठेवून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील सहाआसनी मॅजिक व रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने कणकवली बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. कणकवली शहरातील रिक्षा व सहा आसनी मॅजिक स्टँड मध्ये आज रिक्षा व मॅजिक चा शुकशुकाट होता. यामुळे सार्वजनिक वाहतुकी सह खाजगी प्रवासी वाहतूकही अंशतः बंद झाल्याने प्रवाशांचे ही काही प्रमाणात हाल झाले.पाठिंब्याचे पत्र एसटी कर्मचाऱ्यांना देताना रिक्षा चालक-मालक संघटनेचे अण्णा कोदे, संजय मालडकर, बाळा वराडकर, महेश आमडोसकर, संतोष सावंत, राजू पवार, मनोज वारे, विनायक पाटील, मिलिंद सावंत, महेश झगडे, सचिन बांदिवडेकर आदी उपस्थित होते. एसटी कर्मचारी जनतेच्या सेवेत साठी कार्यरत असताना आपल्या मागण्यांसाठी ते आंदोलन करत असत असते वेळी त्यांचे निलंबन करण्याचा प्रकार व आंदोलन चिरडण्याचा हेतु हे निंदनीय असल्याचे संघटनेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे मायबाप सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याकरिता विठू माऊली व तुळजाभवानी सुबुद्धी देउदे अशी प्रार्थना या रिक्षा संघटना व सहा आसनी मॅजिक संघटनेच्या वतीने या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!