*कोकण Express*
*श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट सन २०२१-२४ च्या अध्यक्षपदी संतोष लब्दे*
*उपाध्यक्षपदी दिनेश धुवाळी,सचिव पदी शरद वाळके,खजिनदार पदी अभय पेडणेकर यांची सर्वानुमते निवड*
*देवगड ः प्रतिनिधी*
तालुक्यातील श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर ट्रस्ट सन २०२१-२४ च्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष हरी लब्दे,उपाध्यक्षपदी दिनेश महादेव धुवाळी,सचिव पदी शरद शिवराम वाळके आणि खजिनदार पदी अभय बाबाजी पेडणेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या विश्वस्त मंडळाच्या सदस्य पदी,संतोष गोपीनाथ लाड,अजय सुधाकर नाणेरकर,विजय भिकाजी वाळके,संजय तुकाराम आचरेकर,प्रकाश राजाराम वाळके,मंगेश रमाकांत पेडणेकर,अनिल कृष्णा धुरी,दीपक केशव घाडी,रुपेंद्र सुरेश धुवाळी,श्रीकृष्ण अनंत बोंडाळे,(पदसिद्ध)सदस्य,विलास दत्तात्रय कुलकर्णी (पदसिद्ध)सदस्य,चंद्रकांत विश्राम घाडी,सरपंच (पदसिद्ध)सदस्य,या प्रमाणे निवड करण्यात आली .