*कोकण Express*
*▪️नमसवाडी ब्राह्मण जत्रा २२ नोव्हेंबर रोजी*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
उभादांडा-नमसवाडी येथील श्री देव ब्राह्मणाचा वार्षिक जत्रौत्सव सोमवार दि. २२ नोव्हेंबर संपन्न होत असून यानिमित्त सकाळपासून केळी, नारळ ठेवणे, रात्रौ नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.