*कोकण Express*
*▪️राज्यात उसळलेल्या दंगलीचा निषेध म्हणून २२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा करणार धरणे आंदोलन*
*▪️भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मालेगाव, अमरावती ,नांदेड मध्यें घडवून आनलेल्या दंगलीचा निषेध भाजपा करत आहे.या दंगलीत भाजपा पदाधिकाऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे.ही दंगल घडविणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला आणि निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.तर या दंगलीचा निषेध म्हणून २२नोव्हेंबर रोजी प्रत्येक तहसीलदार कार्यलयावर धरणे आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना निवेदन भाजपाच्या वतीने दिले जाणार आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषद जिल्हा कार्यालयात घेतली यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या आणि मालेगाव, अमरावती ,नांदेड याठिकाणी हिंसक घटना घडल्या या दंगली घडविल्या गेल्या आहेत.शासन पाहत राहिले.मोठा जमाव रस्त्यावर आला.जमावाने हिंसक प्रतिक्रिया दिली.पोलिसांनी अमरावतीत भाजपा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट करून वेठीस धरले या घटनेचा आम्ही सिंधुदुर्ग भाजपा म्हणून निषेध करतोआणि २२ नोव्हेंबर रोजी या घटनेचा निषेध करत प्रत्येक तहसीलदार कार्यालयावर निषेध आंदोलन करणार आहोत.दंगल घडविणाऱ्या लोकांची आणि एकूणच घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत करा, रझा अकाडमीवर बंदी घाला, भाजपा पदाधिकाऱ्यांवर पूर्व ग्रह दूषित ठेवून केलेली कारवाई थांबवा अशी मागणी केली जाणार आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, ४०/५० हजात लोक एकत्र येतात,जमा करतात आणि दंगल घडवितात मात्र पोलीसांच्या गुप्तचर यंत्रणेला काही कळत नाही.या राज्यात अनधिकृत धंदे सुरू आहेत.वाळू चोरट्या पद्धतीने काढली जाते आणि त्यासाठी वाळूची संघटना शिवसेनेने स्थापन केली आहे.त्यामुळे हे प्रकार थांबणार कधी हे गौर धंदे कोणाच्या नावाने सुरू आहेत. प्रशासन नावाची व्यवस्थाच राहिली नाही.कोरोना बंदीतही ३०० ट्रिप वाळू दरदिवशी गोव्यात जात होती.याचाच अर्थ हे रॅकेट कोण चालवतो त्याचे मूळ शोधा अशी मागणी यावेळी श्री.तेली यांनी केली.
परिवहनमंत्री अनिल परब हे जिल्ह्यातील सुपुत्र आहेत म्हणून एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही अशी अपेक्षा होती मात्र त्यांनी निलंबनाची कारवाई केली.ही कारवाई थांबवा अन्यथा भाजपा आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला.