कणकवली महाविद्यालयात शनिवारी कॅंपस इंटरव्ह्यू

कणकवली महाविद्यालयात शनिवारी कॅंपस इंटरव्ह्यू

*कोकण Express*

*▪️कणकवली महाविद्यालयात शनिवारी कॅंपस इंटरव्ह्यू*

*कणकवली ता.१९-:*

कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम, व बी. एस्सी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि नोकरभरती कक्ष तसेच भारत फायनान्सियल इनक्लूजन लिमिटेड यांच्यावतीने महाविद्यालयात नोकरभरती मुलाखती( कॅंपस इंटरव्ह्यू) आयोजित केले आहेत. १८ ते २८ या वयोगटातील कोणत्याही शाखेचा पदवीधरांसाठी बँकिंग व‌ फायनान्स या क्षेत्रात दरमहा ठोक पगारावर उत्साही पदवीधरांना तात्काळ नेमणुका मिळणार आहेत. तरी इच्छुक पदवीधर विद्यार्थ्यांनी शनिवार २० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या परिसरात मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे,आधार कार्ड,पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स व पासपोर्ट फोटो घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!