हागणदारी नसल्याने जिल्ह्याचे आरोग्यमान सुधारले – संजना सावंत

हागणदारी नसल्याने जिल्ह्याचे आरोग्यमान सुधारले – संजना सावंत

*कोकण  Express*

*▪️उघड्यावर शौचास जाण्याने सर्वात जास्त साथरोग पसरण्याची भीती*

*▪️हागणदारी नसल्याने जिल्ह्याचे आरोग्यमान सुधारले – संजना सावंत*

*मालवण ः प्रतिनिधी*

उघड्यावर शौचास जाण्याने सर्वात जास्त साथरोग पसरण्याची भीती असते. आपला जिल्ह्यात हागणदारी नसल्याने जिल्ह्याचे आरोग्यमान सुधारले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी जिल्हास्तरीय जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. मालवण तालुक्यातील हडी ग्रामपंचायत येथे जिल्हास्तरीय जागतिक शौचालय दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, हडी सरपंच महेश मांजरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकुर, मालवण पं. स.चे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, कृषी अधिकारी गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते सार्वजनिक शौचालय उद्घाटन करण्यात आले. तसेच शोषखड्डा व वैयक्तिक शौचालय बांधकाम भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, राजू परुळेकर, अजिंक्य पाताडे, जयेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!